बेकिंग सोड्याचे काही वेगळे फायदे

आपल्याकडे बेकिंग सोडा जो क्वचितच वापरला जातो  पण आपणाला माहित आहे का  याचा उपयोग केसांपसून ,त्वचा आणि दातासाठीही फार उपयोगी आहे   बेकिंग सोडा फायदे आहेत जे कदाचित आपल्याला माहिती नसतील

*पण लक्षात ठेवा याचा वापर करताना याला जास्त वेळ आपल्या त्वचेवर  ठेवू नका आणि वापर करण्या पूर्वी थोड़ा बेंकिग सोडयाची पेस्ट करा व्  आपल्या हाता वरील त्वचेवर लावून तपासून पहा की कही त्रास होतो की नहीं

बेकिंग सोडा फायदे आहेत जे कदाचित आपल्याला माहिती नसतील

तळपाय स्वच्छ करताना बेकिंग सोड्याचा चांगला फायदा होतो. गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे बेकींग सोडा मिक्स करा. या पाण्यामध्ये 20 मिनिटे पाय बुडवून ठेवा. यामुळे फक्त साचून राहिलेली धुळच जात नाही पण, दुर्गंधीस कारणीभूत बॅक्टेरियासुद्धा नष्ट होतात.

बऱ्याच जणांच्या दातांना पिवळेपणा येण्याचा प्रकार होत असतो. दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल तर बेकिंग सोडा मदतीला येऊ शकतो. थोड्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा आणि हळूहळू दातांवर मसाज करा. यामुळे दातांवरील पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

तुम्हाला जर ब्लॅकहेडची समस्या असेल तर बेकिंग सोड्यात थोडं पाणी मिसळून पेस्ट करा आणि ती ब्लॅकहेड असलेल्या जागी लावा. 15 मिनिटानंतर चेहरा गरम पाण्याने धुवा. यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

बेकिंग सोड्याचा वापर जेवणात अथवा बेकिंग फूडमध्ये केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र केसांतील कोंडा घालवण्यासाठी तसेच दातांवरील पिवळेपण दूर करण्यासाठीही बेकिंग सोड्याचा वापर होतो.

*टीप:- संचयित केलेली आवडलेली माहिती ..वैद्कीय सल्ला महत्वाचा …

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Bitnami