अंघोळ केंव्हा करू नये

अंघोळ केंव्हा करू नये ,अंघोळीचे वेळापत्रक.स्नान म्हणजे शरिराची शुद्धि करणे.सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये.

जितके महत्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्व हे स्नानाला आहे.

अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही ,त्या त्या वेळेला झाली पाहिजे.

ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे 4 ते 6.

मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8.

राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10.

प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12.

त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड.

1)ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ.

ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते.शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते.मनात नकारात्मक विचार येत नाही.आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो.

नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते.

 

2)मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8.

6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते.ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्या सारखा वागतो.  म्हणजे राग द्वेष कमी होतो.

सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो.पण ब्रह्ममहुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही.

 

3)राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10.

8 ते10 ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो.मत्सर लोभ जास्त मनुष्यात येतो. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जड़तात.

अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो.कामात उत्साह नसतो. आळशीपणा काम करतांना सतत येतो त्यामुळे मनुष्य सारखा चिड़चिड़ा होतो.

 

4)प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12.

10 ते 12 ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते.काम करायचा कंटाळा येणे.सतत झोपुन राहणे.

खुप खाणे. त्यामुळे असिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात.

मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही.तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वतावर ताबा राहत नाही.

 

थोडक्यात पण महत्वाचे :-

सकाळी लवकर उठून स्नान करने म्हणजे अनेक आजारांना दूर ठेवणे .

Source Social media.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Bitnami